
उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट आली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होत आहे. नागपूरमध्ये मंगळवारी सकाळपासूनच दाट धुके पडले होते. त्यामुळे नागपूर शहर आणि परिसरात धुक्याची चादर पसरली होती. या दाट धुक्यामुळे रस्ते वाहतूकीसह हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने सर्व विमान उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.
नागपूर शहर आणि परिसरात दाट धुके पसरले होते. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तसेच दृश्यमानता कमी झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने नागपूरमधील सर्व हवाई उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली आहेत. धुक्यामुळे हवाई सेवेला फटका बसला आहे. सर्व हवाई उड्डाणे थांबवण्यात आल्याने सर्व विमाने धावपट्टीवरच थांबून आहेत.
शहर आणि परिसरात दाट धुके आणि ढगाळ वातावरणामुळे गारठा वाढला आहे. तापमानात घट होत आहे. उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट आली आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी होत असल्याने उत्तर हिंदुस्थानातील काही भागात पावसाच इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भातही दोन दिवसात काही ठिकाणी हलक्या सरी कोळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागपरूच्या हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

































































