बाळंतपणानंतर पहिल्या महिन्यात घ्या असा आहार, अशक्तपणा होईल दूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाळंतपणानंतर बाईचा दुसरा जन्म होतो असे म्हटले जाते. नऊ महिने बाळाला गर्भात वाढविल्यानंतर बाळंतकळा सोसून जेव्हा मूल जन्माला येते तो क्षण प्रत्येक महिलेसाठी सर्वात सुखाचा क्षण असतो. मात्र या बाळंतकळांच्या वेळी महिलेच्या शरीरातील सर्व त्राण निघून गेलेले असतात. स्तनपान, बाळाचा शी शू काढणे, त्याला झोपवणे, बाळाचे रात्रीचे रडणे या सगळ्यामुळे अनेक महिलांना अशक्तपणा येतो. या काळात महिलाचा आहार योग्य असणे अत्यंत गरजे असते.

आज आम्ही तुम्हाला बाळंतपणानंतरच्या पहिल्या महिन्यात तुमचा आहार कसा असला पाहिजे त्याबद्दल सांगणार आहोत. असा समतोल आहार तुम्ही घेतलात तर तुमची एनर्जी लेव्हल टिकून राहिल

ओट्स

ओट्समध्ये फायबर व प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते व शरीराला योग्य पोषण मिळते. ओट्समुळे बाळाला लागणारे दूधही वाढण्यास मदत होते. ओट्समुळे पचनशक्ती चांगली राहते.

सुका मेवा

बाळंतीणीने सुका मेवा खाणं नेहमीच चांगलं. त्यात प्रोटीन असतात व नाश्त्याच्या सोबत ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने पोट भरलेले राहते. सुक्या मेव्यातील पौष्टीक तत्त्वांमुळे दूधावाटे बाळालाही पौष्टीक तत्त्व मिळतात व त्यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास चांगला होतो.

दही

सकाळी नाश्त्यात दही खाणे फायदेशीर ठरते. थंड दही खाऊ नये.

अंड

अड्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन व जीवनसत्त्व असतात.

रताळं

रताळं खाल्ल्याने शरीरातील प्रतिकारकक्षमता वाढते व त्यामुळे महिलेची एनर्जी लेव्हल देखील वाढते.