
नागरिकांना आता ठिकठिकाणी आधारकार्डची फोटोकॉपी (झेरॉक्स) द्यायची गरज भासणार नाही. यूआयडीएआय लवकरच आधार व्हेरिफिकेशनसाठी नवा नियम लागू करणार आहे, ज्यामुळे हॉटेल, इव्हेंट ऑर्गनायझर यांसारख्या संस्थांकडून ग्राहकांच्या आधारकार्डची छायांकित प्रत कागदी स्वरूपात साठवून ठेवण्याच्या प्रथेला पूर्णविराम मिळेल.
यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी सांगितले की, प्राधिकरणाने नवा नियम मंजूर केला आहे. यानुसार हॉटेल, इव्हेंट ऑर्गनायझर इत्यादी संस्थांना आधार-आधारित व्हेरिफिकेशनसाठी ‘रजिस्ट्रेशन’ करणे अनिवार्य असेल. नोंदणीकृत संस्थांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल, ज्यामुळे ते क्यूआर कोड स्पॅन करून किंवा आधारच्या नवीन अॅपद्वारे व्हेरिफिकेशन करू शकतील. आतापर्यंत तुम्ही हॉटेलमध्ये चेक-इन करताना किंवा एखाद्या मोठय़ा कार्यक्रमात नाव नोंदवताना आधारकार्डची झेरॉक्स घेतली जायची. यूआयडीएआयच्या मते असे कागदपत्रे घेणे आणि ती साठवून ठेवणे चुकीचे आहे आणि त्यामुळे तुमच्या खासगी माहितीला धोका असतो. म्हणूनच लवकरच एक नवीन नियम आणला जाणार आहे.

























































