ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी केंद्राच्या सेवेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेवानिवृत्तीचा काही काळ उरलेला असतानाच ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झाले आहेत. केंद्र सरकारच्या नॅशनल कॅपिसिटी बिल्डिंग कमिशनचे सदस्य म्हणून ते काम पाहणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असणारे प्रवीण परदेशी हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. राज्य सरकारने बुधवारी त्यांची मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर काही तासांतच आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते केंद्राच्या सेवेत दाखल झाले आहेत. परदेशी आपल्या नव्या भूमिकेत केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि संसाधने तयार करण्यासाठी सर्व सरकारी कार्यालये आणि प्रशिक्षण संस्था यांच्याशी समन्वय साधून देखरेख ठेवतील. पंतप्रधानांच्या सार्वजनिक मानव संसाधन परिषदेला वार्षिक क्षमता वाढवण्याच्या योजनांना मान्यता देण्याचे काम या आयोगातर्फे करण्यात येणार आहे.