गुलाम नबी आझाद अनंतनाग- राजौरीमधून लढणार

जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद हे अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. 2022 मध्ये काँग्रेस सोडल्यावर स्थापन केलेल्या डेमोव्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी या पक्षाचे ते उमेदवार असतील.

2019 मध्ये अनंतनागमधून नॅशनल कॉन्फरन्सचे हसनैन मसुदी निवडून आले होते. काँग्रेसचा उमेदवार त्यावेळी दुसऱया क्रमांकावर होता. महबूबा मुफ्ती या 2014 मध्ये येथे जिंकल्या होत्या. अनंतनाग क्षेत्र मुस्लिमबहुल असले तरी पुंछ आणि राजौरी जिह्यांत गुज्जर आणि पहाडी जमातींची लोकसंख्या आहे.