
आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी टिम इंडियाच्या खेळाडूंची घोषणा नुकतीच करण्यात आली. खेळाडूंची निवड झाल्यावर अनेकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही माजी क्रिकेटपटूंनीही निवड समितीने योग्य खेळाडींचू निवड करावी, असा सल्ला दिला होता. काँग्रेसच्या एका मुस्लीम नेत्याने निवड समितीवर टीका केली असून खेळाडूंची निवड निष्पक्षपातीपण झाले नसल्याचे नमूद करत काही खेळाडूंची नाव घेत त्या का वगळले, असा सवाल केला आहे. त्यांनी निवड समितीवर टीका करत या घटनेला वेगळेच वळण दिल्याने वाद होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि किशनगंज जिल्ह्यातील बहादूरगंज विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तौसीफ आलम या प्रश्नाला वेगळेच वळण दिले आहे. त्यांनी निवड समितीवर नाराजी व्यक्त करत निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. टिम इंडियातील खेळाडूंची निवड निष्पक्षपातीपणे होत नाही, तोपर्यंत आपण क्रिकेट बघणार नाही, असे त्यांनी फेसबुक पोस्टवर लिहिले आहे. निवड समितीने केलेल्या खेळाडूंच्या निवडीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मोहम्मद शमी , सिराज, खलील यासारख्या खेळाडूंना संघात स्थान न देणे, हे धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शमी,सिराज आणि खलीलसह अनेक खेळाडू आहेत ज्यांना संघात स्थान मिळाला हवे होते. टी-20 विश्चषकात आपली लढाई जगातील अनेक बलाढ्या संघाशी होणार आहे. त्यामुळे आपला संघ मजबूत असायला हवा. या सामन्यात टिम इंडियाचा पराभव झाला तर तो हिंदुस्थानचा पराभव असेल. त्यामुळे निवड समितीकडून निष्पक्षपाती निवड झाली नसल्याचे आपल्याला वाटते, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तौसीफ यांच्या या पोस्टवर तीन तासात 250 पेक्षा जास्त कमेंट आल्या असून 1200 पेक्षा जास्त जणांना लाइक केले आहे. अनेकांनी या पोस्टचे समर्थन केले आहे. निवड समितीवर आणि निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असले तरी तौसीफ यांनी याला वेगळेच वळण दिल्याने वाद होण्याची शक्यता आहे. याआधीही अनेक वादग्रस्त पोस्टमुळे ते चर्चेत आले होते. भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याबाबतही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती.



























































