टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमारच्या कारला अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमारच्या कारला उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्याची आलिशान कार लँड रोव्हर डिफेंडरला धडक दिली. या अपघाताच्यावेळी त्याचा मुलगाही गाडीत होता. या अपघातात दोघांना किरकोळ इजा झाली आहे मात्र या अपघातात प्रवीण कुमारच्या कारचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. गाडीची स्थिती पाहिल्यास प्रवीण कुमार आणि त्याचा मुलगा चमत्कारिकपणे बचावल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. प्रवीण कुमारचा कार अपघात होण्याची ही दुसरी वेळ आहे.