…अखेर राष्ट्रवादीचे माजी खासदार दुधगावकर यांची जामीनावर मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ganesh-dudhgaonkar

सामना प्रतिनिधी । परभणी

ज्ञानोपासक कर्मचारी गृहनिर्माण संस्थेच्या भुखंड हडपल्याप्रकरणी माजी खासदार गणेशराव दुधगावकर आणि तत्कालीन तलाठी दत्तात्रय कदम या दोघांची दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप कश्यप यांची मंगळवारी सशर्त जामीनावर सुटका केली आहे. या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

100 कोटींचा भुखंड घोटाळा: माजी मंत्री अ‍ॅड. गणेशराव दुधगावकरही गजाआड

ज्ञानोपासक कर्मचारी गृहनिर्माण संस्थेच्या भुखंड हडपल्याप्रकरणी माजी खासदार गणेशराव दुधगावकर आणि तत्कालीन तलाठी दत्तात्रय कदम या दोघांना नानलपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी दोन दिवसांची पोलीस कोठडी लोअर कोर्टाने दिली होती. या दोघांचीही न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर तपास पूर्ण झाला आहे. जामीन मिळावा, यासाठी न्यायालयास या दोघांच्या वतीने अर्जाद्वारे मागणी करण्यात आला होता.

दरम्यान, न्यायालयाने या दोघांचे अर्ज दाखल करुन घेत शनिवारी सुनावणी केली. सोमवारी ही सुनावणी पूर्ण झाली आणि न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला. जामीन अर्जावर काय निर्णय होतो? यासाठी विशेषत: न्यायालय परिसरामध्ये गृहनिर्माण संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने दिसत होते. सोमवारपर्यंत सुनावणी लांबल्यामुळे न्यायालयीन कोठडीतला गणेशराव दुधगावकर आणि डि.एस. कदम यांचा मुक्काम वाढला होता. या प्रकरणी मंगळवारी सुनावणी पूर्ण होऊन गणेशराव दुधगावकर आणि डी.एस. कदम यांची सशर्त जामीनावर मुक्तता न्या. दिलीप कश्यप यांनी केली आहे.