
पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे आज निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. फेब्रुवारीमध्ये घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानंतर ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर रावळपिंडीच्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरू होते.
जखमी बाजवा यांच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सुरुवातीला डॉक्टरांनी जाहीर केले होते, मात्र काही दिवसांतच त्यांची प्रकृती आणखी खालावत गेल्याने त्यांचे आज निधन झाले. बाजवा हे 2016 ते 2022 या कालावधीत पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख होते. निवृत्तीनंतर ते राजकारण आणि समाजकार्यात सक्रिय होते. शिवाय यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी ख्याती मिळवली होती. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्याशी सुरुवातीला दोस्ती आणि नंतर मतभेद यामुळेही ते चर्चेत आले होते.


























































