
मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात जन्मलेल्या केजीपी१२ (KGP12) या मादी चित्त्याची चारही पिल्ले मृत आढळून आली आहेत. १२ मे २०२६ रोजी सकाळी देखरेख पथक श्योपूर प्रादेशिक विभागात पोहोचले, तेव्हा त्यांना पिल्लांचे मृतदेह आढळले.
कुनो व्यवस्थापनाने सांगितले की, पिल्लांचे मृतदेह अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळले. त्यांचा जन्म ११ एप्रिल, २०२६ रोजी झाला होता आणि ते फक्त एक महिन्याचे होते. देखरेख पथकाने त्यांना ११ मे रोजी संध्याकाळी शेवटचे जिवंत पाहिले होते. प्राथमिक तपासानुसार, दुसऱ्या एखाद्या वन्य प्राण्याने त्यांची शिकार केली असावी. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेनंतर कुनोमध्ये ५० आणि देशात ५३ चित्ते शिल्लक राहिले आहेत.
मादी बिबट्या केजीपी१२ पूर्णपणे सुरक्षित आणि निरोगी आहे. कडक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विभागाचे पथक सध्या परिसरावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पार्कमधील इतर सर्व चित्ते पूर्णपणे निरोगी आहेत. क्षेत्र संचालकांच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर आता कुनो राष्ट्रीय उद्यानात एकूण ५० चित्ते शिल्लक राहिले आहेत. यापैकी ३३ चित्ते हिंदुस्थानात जन्मलेले आहेत. याव्यतिरिक्त, गांधी सागर अभयारण्यात तीन चित्ते आहेत. परिणामी, देशातील चित्त्यांची एकूण संख्या आता ५३ झाली आहे.




























































