गोव्यात कोरोनाचा चौथा बळी, भाजप आमदारालाही कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ताळगाव येथील कोरोना रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा चार झाला आहे. काँग्रेसचा हात सोडून भाजप मध्ये आलेल्या सासष्टि तालुक्यातील एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यात आज नवीन 72 रुग्ण सापडले असून 74 जण बरे होऊन घरी गेले आहेत. आता पर्यंत 1387 रुग्ण सापडले असून त्यातील 713 सक्रिय आहेत.670 जण बरे होऊन घरी गेले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. मांगोर हिल मध्ये 253 रुग्ण असून मांगोर हिलशी निगडीत 194 रुग्ण राज्यात आहेत.

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना देखील सरकारने गुरूवारपासून राज्यातील हॉटेल्स सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड निगेटीव्ह पर्यटकांसाठी उद्या पासून गोव्याची दारे खुली होणार असली तरी कोरोना रुग्ण वाढत असल्याने लोकांना सरकारचा हा निर्णय पचनी पडलेला दिसत नाही.