
कंपनीत पेट्रोलिंग करणार्या सुरक्षा रक्षकांवर गिलवरीने दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केले. चंदनाची लाकडे कोठे लपवली आहेत, अशी विचारपूस करीत बेदम मारहाण केली. ही घटना 13 डिसेंबरला रात्री पावणेआठच्या सुमारास कोंढव्यातील एनआयबीएम कंपनी कॅम्पसमध्ये घडली आहे.
राहूल देवकर (वय 40) आणि देवेंद्रसिंह अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चारजणांविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राहूल देवकर हे कोंढव्यातील एनआयबीएम कंपनीत सुरक्षा रक्षक आहेत. 13 डिसेंबरला रात्रीच्या सुमारास ते देवेंद्रसिंह यांच्यासोबत पेट्रोलिंग करीत होते.
त्यावेळी आलेल्या चौघा चोरट्यांनी गिरवरीतून दगडाने राहूलवर हल्ला केला. चंदनाची लाकडे कोठे ठेवली आहेत, अशी विचारणा करून चोरट्यांनी दोघा सुरक्षा रक्षकांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वराज पाटील तपास करीत आहेत.
































































