
सामना ऑनलाईन । नोएडा
मित्रांकडून 10 लाखांची उधारी मागितली म्हणून चार मित्रांनी मित्रांचा खूनच केला आहे. नोएडामधील ही घटना असून गुन्हेगारांनी मृतदेह गंगेच्या पात्रात फेकून दिला. पोलिसांनी मृतदेह शोधण्यासाठी पाणबुड्यांना सांगितले आहे.
मोहित नागर या तरुणाने आपला मित्र प्रशांतला तीन लाख रुपये दिले होते. तर गौरवला सात लाख रुपये उधार दिले होते. या दोघांकडे मोहितने पैसे परत मागितले. परंतु त्यांनी हे पैसे परत दिलेच नाही. मोहितने या पैशांचा तगादा लावला. त्याला कंटाळून प्रशांत आणि गौरवने मिळून मोहितचा खून केला. यासाठी त्यांचे मित्र अखिल आणि वरुण यांनी साथ दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौघांनी गंगेच्या पात्राजवळ मोहितला गोळी घातली. त्यानंतर मोहितचा मृतदेह नदी पात्रात फेकला. मोहितच्या लहान भावाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली. मृतदेह शोधण्यासाठी पाणबुड्यांची मदत घेतली असून पाण्याचा प्रवाहही कमी केला आहे.
























































