देवगड समुद्रात पुण्याचे सहा विद्यार्थी बुडाले, चौघांचा मृत्यू; एक बेपत्ता, एकाला वाचविण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड येथील समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक बुडाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी 3.30 वा सुमारास घडली. पुणे येथील खासगी सैनिक अॅकॅडमीचे विद्यार्थी होते. देवगड समुद्रात आनंद लुण्यासाठी हे सर्वजण उतरले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण बुडाले. यातील एकाला वाचविण्यात यश आले आहे, तर एक जण बेपत्ता असून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली

पुणे येथील सैनिक अॅकॅडमीची सहल सिंधुदुर्ग पर्यटनासाठी शुक्रवारी प्रथम मालवण येथे आली. शनिवारी सकाळी कुणकेश्वर करून दुपारी देवगडला पवनचक्की येथे आली. या सहलीमध्ये एक शिक्षक व विद्यार्थी असे एकूण 35 जण होते. जेवण झाल्यानंतर पवनचक्की येथून यातील काही विद्यार्थी देवगड बीच येथे दुपारी 3.30 वा सुमारास उतरले. यातील आकाश तुपे, प्रेरणा डोंगरे, अनिषा पवळ, अंकिता गालटे, पायल बनसोडे, राम डिचोलकर हे विद्यार्थी समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले.

हे पाहताच किनाऱयावर असणाऱया सहकाऱयांनी आरडाओरड केली. त्यावेळी जीवरक्षक आणि स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव केली. त्यांनी पाण्यात उतरून त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. यातील आकाश तुपे याला वाचविण्यात यश आले तर राम डिचोलकर हा बेपत्ता असून उर्वरित चार जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर यात चारही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

घटनास्थळी तहसीलदार आर. जे. पवार. पोलीस निरीक्षक नीलपंठ बगळे, नगराध्यक्ष साक्षी प्रभू तसेच पोलीस कर्मचारी, न. प. कर्मचारी दाखल झाले. यातील बेपत्ता डिचोलकर याचा शोघ सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांसह नगराध्यक्ष साक्षी प्रभू, नगरसेवक संतोष तारी, शरद ठुकरूल, बुवा तारी, तहसीलदार रमेश पवार, देवगड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करण्यास मदत केली तसेच देवगडातील सामाजिक कार्यकर्त्यांनीदेखील मोठा सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.