
तालुक्यातील टाकळी फाटा येथे खरवंडीकडून पाथर्डीकडे येणाऱ्या एका चारचाकी गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, कारमधील भाविकांची 40 हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल जाळून खाक झाला आहे.
रायगड जिह्यातील 4 भाविक हे तुळजापूर येथे देवीचे दर्शन घेऊन शिर्डीकडे जात असताना त्यांच्या कारने टाकळी फाटय़ाजवळ असलेल्या विश्वविनायक लॉन्ससमोर अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच, त्यांनी प्रसंगावधान दाखवत कार थांबवून खाली उतरले. त्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केल्याने कार जाळून खाक झाली. पाथर्डी पालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग विझवली.



























































