मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिषाने फसवणूक, पतीपत्नीविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दांपत्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृत शैलेश औटी आणि शैलेश रमेश औटी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुरेश शांताराम बागुल (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे.

सुरेश मुलाला आणि नातेवाईकांना मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून औटी दाम्पत्याने सुरेश यांच्याकडून 1 लाख ८५ हजार रुपये घेतले. मात्र, औटी दांपत्याने नोकरी न लावता फसवणूक केली. त्यानंतर यांनी दिलेले पैसे परत मागितले असता आरोपीने टाळाटाळ करून पैसे परत दिले नाहीत. याप्रकरणी कोथरूड पोलिस तपास करीत आहेत.