
एका नामांकित खासगी कंपनीच्या प्रोजेक्ट इंजिनीअरच्या मोबाईलचा अॅक्सेस घेऊन 15 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार हे पवई येथील खासगी कंपनीत प्रोजेक्ट इंजिनीअर म्हणून काम करतात. फेब्रुवारी महिन्यात त्यांना खासगी फायनान्स कंपनीमधून पह्न आला होता. त्यांनी कंपनीकडून कर्ज घेतले आहे. त्या कर्जाची रक्कम परतफेड केली नसल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी कोणत्याही कंपनीकडून कर्ज घेतले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ठगाने त्यांना कर्जाचा तपशील पाठवला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने त्याचे सिबिल स्कोअर तपासला. तेव्हा त्याच्या नावाने तीन फायनान्स कंपनीकडून कर्ज घेण्यात आल्याचे समोर आले. तसेच त्यांच्या चार व्रेडिट कार्डचे व्यवहार झाले होते. त्यांनी बँकेला पह्न करून कार्ड बंद करण्यास विनंती केली. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस घेऊन कर्ज घेतले.