‘वंदे भारत’मध्ये पाण्याची बाटली मोफत

वंदे भारत ट्रेनमध्ये प्रत्येक प्रवाशाला अर्धा लिटरची रेल नीरची पाण्याची बाटली मोफत देण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. प्रवाशाच्या मागणीनुसार आणखी अर्धा लिटरची बाटली हवी असल्यास कोणतीही अतिरिक्त रक्कम न आकारता उपलब्ध करून दिली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे रेल्वेने सांगितले.