Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘3 जुलै’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Monday, july 3, 2023)
आईवडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. घरात भावंडांची मदत मिळेल. मित्रमंडळींसोबत सभासमारंभात सहभागी व्हाल. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीमुळे आनंद मिळेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आहार, व्यायाम, झोप याकडे लक्ष द्या. अर्धवट राहून गेलेली कामे वेळेत पूर्ण कराल. गायीला पोळी खाऊ घाला.
शुभरंग- गुलाबी

वृषभ (TAURUS – Monday, july 3, 2023)
एखाद्या गोष्टीचा अति विचार केल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घ्या. अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे. आपल्या सांगण्यावर लोकं विश्वास ठेवतील. स्वभावात नम्रता आणावी लागेल. कुटुंबात आनंदाची बातमी कळण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठांच्या सेवेची संधी सोडू नका. आवडते झाडाचे रोपटे घराच्या अंगणात लावा.
शुभरंग – पिवळा

मिथुन (GEMINI – Monday, july 3, 2023)
नेहमीच्या कामाव्यतिरिक्त लोकांच्या भेटीगाठीचा आनंद घ्याल. तुमच्या चांगल्या कर्मांमुळे कामात यश मिळेल. महत्त्वाच्या व्यक्तिंचे संपर्क वाढवाल. आहाराकडे लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या. विजेच्या वस्तूंची खरेदी कराल. कौटुंबिक सुख लाभेल. कुमारिकांना भेटवस्तू द्या.
शुभरंग- लाल

कर्क (CANCER -Monday, july 3, 2023)
दुर्गाकवच वाचा. आर्थिक स्थिरता लाभेल. कुटुंबातील वातावरणाचा सुखद अनुभव घ्याल. मौल्यवान वस्तूंची खरेदी होण्याची शक्यता आहे. व्यावहारिक अडचणींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. कुटुंबात धार्मिक सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. विवाहित जोडप्यांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे.
शुभरंग- हिरवा

सिंह (LEO -Monday, july 3, 2023)
झालेल्या नुकसानाची भरपाई मिळेल. आवडीचा पदार्थ अनेपेक्षितरित्या खायला मिळेल. दिवस आनंदात जाईल. कोणाशी भांडण, वादविवाद घालू नका. गोड बोला. मानसिकदृष्ट्या उत्साही राहल. गोड पदार्थ खाऊन नवीन कार्याला आरंभ करा. नेहमी खरं बोला.
शुभरंग- गुलाबी

कन्या (VIRGO – Monday, july 3, 2023)
आर्थिक स्थिती चांगली असेल. घराबाहेर पडताना थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्या. डोळ्यांची काळजी घ्या. रोजनिशीचे पालन करा. कितीही राग आला तरी डोक्यावर बर्फ ठेवायला शिका. धार्मिक कार्यात सहभागी व्हा. आरोग्याची काळजी घ्या. नावडते कामही आवडीने करा. पिंपळाच्या वृक्षाला पाणी घाला.
शुभरंग – पोपटी

तूळ (LIBRA – Monday, july 3, 2023)
शिवपिंडीवर अभिषेक घाला. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. वाढते वजन नियंत्रणात ठेवा. दातांची काळजी घ्या. मानसिक शांततेकरिता ध्यानधारणा, नामजप करा.

शुभरंग- खाकी

वृश्चिक ( SCORPIO – Monday, july 3, 2023)
अनावश्यक खर्च करू नका. एखाद्या रमणीय स्थळी प्रिय व्यक्तिसोबत सहलीचा आनंद घ्याल. निरोगी आरोग्याकरिता पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. मारुतीच्या देवळात जा. गरिबांना गोड पदार्थ खाऊ घाला.
शुभरंग – चॉकलेटी

धनु (SAGITTARIUS – Monday, july 3, 2023)
आपल्याविषयी प्रिय व्यक्तिने करून घेतलेले गैरसमज दूर होतील. नवीन प्रकल्प किंवा योजना हाती घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. बचत करण्यात यशस्वी व्हाल. जास्त विचार करू नका. वेळेचा दुरुपयोग करू नका. प्रिय व्यक्तिला चांदीची वस्तू भेट द्या.
शुभरंग- केशरी

मकर ( CAPRICORN – Monday, july 3, 2023)
छल्ला किंवा अंगठी वापरा. सौंदर्यात भर पडेल. योग्य वेळी निर्णयात बदल करावा लागेल. घरातील लहान मुलांसोबत रमून जाल. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. कार्यालयातून काही दिवसांच्या सुट्टिवर गेलात तरी काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीतही सारं काही सुरळीत पार पडेल. आराम करा.
शुभरंग – जांभळा

कुंभ (AQUARIUS – Monday, july 3, 2023)
आपले मनोधैर्य उंचावेल. घरगुती कामात व्यस्त राहाल. कोणालाही वचन देण्यापूर्वी सत्यतेची खात्री करून घ्या. मेहनत आणि सहनशीलता हे गुण अंगी बाणवावे लागतील. आज मानसिक शांतता अनुभवाल. जोडीदारासोबत सायंकाळी पार्कात फिरायला जाल. दत्त मंदिरात दर्शनासाठी जाल.
शुभरंग – आकाशी

मीन (PISCES – Monday, july 3, 2023)
पटकन रागवू नका. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा. स्वत:मधील कौशल्य विकसित करावं लागेल. सदा हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वामुळे इतरांचे ह्रदय जिंकून घ्याल. छोटे प्रवास कराल. कामाच्या नवीन संधी चालून येतील. आरोग्याची काळजी घ्या. सकाळी तुळशीला पाणी घाला.
शुभरंग – निळा