Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? वाचा “15 जून”चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Thurday, June 15, 2023)
काचेच्या बाटलीतील पाणी प्या. घरातील वातावरण सकारात्मक ठेवा. नावीन्यपूर्ण संकल्पना कृतीत आणण्यासाठी प्रयत्न कराल. सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. अनावश्यक गप्पा मारण्यात वेळ घालवाल. कोणत्याही कागदपत्रांवर सही करू नका. आहारात गुळाचा समावेश करा.
शुभरंग : मोरपिसी

वृषभ (TAURUS – Thurday, June 15, 2023)
हिरव्या रंगाचे कपडे परिधान कराल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्या. कल्पनाविश्वात रमत बसू नका. घरातील फुलदाणीत ताजी पांढऱ्या रंगाची अष्टरची फुले ठेवा. प्रिय व्यक्तीवरील भावनिक नातं अधिक घट्ट होईल.
शुभरंग : चंदेरी

मिथुन (GEMINI – Thurday, June 15, 2023)
आराध्यदेवेतेच स्मरण करा. विवेकाने निर्णय घ्यावा लागेल. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वत:ला गुंतवाल. व्यस्त दिनचर्या असेल. रिकाम्या वेळेत काही रचनात्मक कार्य कराल. आज मनसोक्त फिरावेसे वाटेल. सामाजिक कार्यात यथाशक्ती मदत कराल. मिळालेल्या संधीचे सोने कराल.
शुभरंग : सोनेरी

कर्क (CANCER – Thurday, June 15, 2023)
भावंडांना लाल रंगाच्या कपड्यांची मदत कराल. आरोग्याची काळजी घ्याल. राहिलेली देणी वेळेत देऊन टाका. जोडीदाराला विश्वासात घेऊन तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे, ते सांगा. नोकरीत आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत नाटक बघायला जाल.
शुभरंग : आकाशी

सिंह (LEO – Thurday, June 15, 2023)
कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. अनावश्यक वेळ वाया जात नाही ना, याकडे लक्ष द्याल. जोडीदाराच्या तब्येतील काळजी घ्या. चिनीमातीच्या फुलदाणीत लाल गुलाबाची फुले ठेवा.चांदीच्या ग्लासातून पाणी प्याल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
शुभरंग : खाकी

कन्या (VIRGO – Thurday, June 15, 2023)
कपाळावर पांढरा चंदनाचा टिळा लावा. इतरांना मदत कराल. व्यवसायात नवीन संकल्पना सुचण्याची शक्यता आहे. केशरमिश्रीत दूध प्या. कुटुंबासाठी वेळ काढाल. आवडते पुस्तक वाचणे, संगीत ऐकणे यामध्ये रमाल. कोणाकडूनही उधार घेऊ नका. जोडीदार कामात सहकार्य करेल. आरोग्य चांगले राहिल.
शुभरंग : नारिंगी

तूळ (LIBRA- Thurday, June 15, 2023)
समाजात मानसन्मान वाढेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांमधील संबंधांमध्ये सुधारणा होईल. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी लागेल. देवळात किंवा इतर धर्मादाय ट्रस्टला अन्नदानासाठी मदत करा. कबूतर किंवा कावळा यांना गाठ्या खाऊ घाला.
शुभरंग : हिरवा

वृश्चिक ( SCORPIO – Thurday, June 15, 2023)
कोणताही ताणतणाव घेऊ नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. गाईला पोळी खाऊ घाला. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. गरजवंतांना मदत केल्यामुळे समाजात आदर मिळेल. कोणाचाही अनादर करू नका. दत्त मंदिर किंवा स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्या. मन:शांतीकरिता प्रयत्न करावे लागतील. गणपतीला जास्वंदाचे फूल वाहा.
शुभरंग : शेंदरी

धनु (SAGITTARIUS – Thurday, June 15, 2023)
आजची सकाळ उत्साहात जाईल. सहकाऱ्यांसोबत व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. रेंगाळलेली कामे मार्गी लावाल. नवीन पोषाखांची खरेदी कराल. एखादे नवीन काम तुम्हाला आनंद आणि समाधान मिळवून देईल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.
शुभरंग : खाकी

मकर ( CAPRICORN – Thurday, June 15, 2023)
धार्मिक ठिकाणी शुद्ध तुपाचे दान करा. शरीराला तेलाने मसाज करा. सकारात्मक राहा. प्रिय व्यक्तिला समजून घ्या. चूक मान्य करायला शिका. नवीन कलेशी जोडले जाण्याची इच्छा होईल. कोणालाही गृहित धरू नका. घरातील भावंडांची मदत मिळेल. घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न असेल.
शुभरंग : राखाडी

कुंभ (AQUARIUS – Thurday, June 15, 2023)
पांढरी मिठाई गरिबांना दान करा. आज खास व्यक्तिची ओळख होऊ शकते. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. महागडी किंवा मौल्यवान वस्तू प्रिय व्यक्तिकडून भेट स्वरुपात मिळेल. मार्गदर्शनामुळे प्रगतीसाठी नवीन संकल्पना सुचण्याची शक्यता आहे. इतरांना मदत करण्यासाठी वेळ आणि शक्ती खर्च कराल.
शुभरंग : पांढरा

मीन (PISCES – Thurday, June 15, 2023)
जमीन खरेदीची योजना आखाल. तुम्हाला होणाऱ्या त्रासापासून आज सुटका होईल. पैसे खर्च करताना काटकसर करा. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करा. विहिरी, तळे, टॅंकमधल्या माशांना खाऊ घाला. कोणताही निर्णय घेताना इतरांचाही विचार कराल. रिकामा वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या.
शुभरंग : केशरी