
सामना ऑनलाईन, मुंबई
महाराष्ट्रातील पदवीधरांना केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आयोजित केलेल्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी आणि उच्च पदावर संधी मिळावी, यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे 13 जानेवारी, 2019 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत लालबागच्या हनुमान मंगल कार्यालय, चिवडा गल्ली येथे आयएएस,आयपीएस विनामूल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराचे उद्घाटन मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जायस्वाल (आयपीएस) यांच्या हस्ते होणार आहे. परिमंडळ 4 च्या पोलीस उपायुक्त एन. अंबिका (आयपीएस) यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. पुणे येथील युनिक ऍकॅडमीचे संचालक आणि यूपीएससी परीक्षेचे मार्गदर्शक प्रा. मनोहर भोळे ‘यूपीएससी परीक्षेची संपूर्ण तयारी आणि यशाचा गुरुमंत्र’, विदर्भातील जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ ‘प्रशासकीय सेवेचे शिवधनुष्य पेलताना’ आणि अवघ्या 21 व्या वर्षी अथक परिश्रमाने आयएएस झालेले अन्सार शेख ‘आयएएस 21 व्या वर्षी’ यावर मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांनी मंगळवार, 8 ते गुरुवार 10 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत नावनोंदणी लालबागचा राजा प्रबोधिनी, पेरू कंपाऊंड चाळ, लालाबाग येथे प्रत्यक्ष येऊन नोंदवावीत. अधिक माहितीसाठी संपर्क ः 24715959/24715958.





























































