स्वातंत्र्य दिनाला लोकांचा आनंद द्विगुणित होणार, ‘मुस्कान’ उपक्रमाद्वारे 9 राज्ये आणि 25 शहरांमध्ये पसरवणार गोडवा

स्वातंत्र्य दिनानिमित्त तब्बल 9 राज्ये आणि 25 शहरांमध्ये मुस्कान या उपक्रमाद्वारे गोडवा पसरवण्याचे काम अप्सरा आईस्क्रीम करणार आहे. तब्बल 53 हजार आईस्क्रीमचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. विविध स्वयंसेवी संस्था, अनाथालये, वृद्धाश्रम आणि सरकारी तसेच गैर-सरकारी क्षेत्रांमधील विविध प्रतिष्ठानांमध्ये हे आईस्क्रीम वितरित करण्यात येणार आहे.

आप्सरा आईस्क्रीम त्यांचा 53वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. लायन्स क्लब, लिओ, लायन इंटरनॅशन, स्वदेस फाउंडेशन, लिओ इंटरनॅशनल, लिओ क्लब ऑफ अंधेरी अचिव्हर्स, रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट, श्री नित्यानंद एज्युकेशन ट्रस्ट यांसारख्या आघाडीच्या सामाजिक संस्थाही या उपक्रमाचा भाग होणार आहेत.

समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचणे या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे अप्सरा आईस्क्रीमचे संस्थापक आणि भागीदार नेमचंद शहा म्हणाले. ‘मुस्कान’ हा उपक्रम 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असून सुरुवातीला मुंबई आणि पुणे, त्यानंतर बाकीच्या शहरांमध्ये राबवण्यात येणार आहे, अशी माहिती अप्सरा आईस्क्रीमचे व्यवस्थापकीय भागीदार केयूर शहा यांनी दिली.