
शिवसेनेची अंगिकृत संघटना शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने 27 जूनला दुपारी 4.30 वाजता शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हस्ते पुण्यातल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मोफत कायदेशीर सल्ला केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पुलाची वाडी, डेक्कन जिमखाना इथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे अध्यक्ष अॅड. नितीश सोनवणे, उपाध्यक्ष (प्रभारी) अॅड. स्वप्ना कोदे, सरचिटणीस अॅड. मनोज कोंडेकर, चिटणीस अॅड. सुमीत घाग, चिटणीस अॅड. दर्शना जोगदनकर आदी उपस्थित राहणार आहेत.