
दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने मुंबईतील आघाडीची योग संस्था न्यू एज योग इन्स्टिटय़ूटने धारावीतील रहिवाशांसाठी मोफत योग शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम 200 तास आणि तीन महिन्यांचा असून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत योग प्रमाणन मंडळ यांच्याकडून राष्ट्रीय स्तरावर प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
दहावी उत्तीर्ण व्यक्तीला या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. हा उपक्रम विशेषतः धारावीतील विद्यार्थी, गृहिणी आणि तरुण यांच्यासाठी आखण्यात आला आहे. 1994 साली स्थापन झालेल्या या संस्थेने आजवर 40 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून 54 बॅचेसमध्ये 600हून अधिक योग शिक्षक घडवले आहेत. धारावीतील प्रत्येक घरात एक योग शिक्षक असावा हे आमचे या उपक्रमामागचे ध्येय असल्याचे संस्थेचे सीईओ आणि इंडियन योग असोसिएशनचे (महाराष्ट्र) सचिव नितीन पतकी यांनी सांगितले. नावनोंदणीसाठी संपर्क ः 9320179320.





























































