अपहरणाच्या गुन्ह्यात 20 वर्षांपासून फरार असलेल्याला अटक

अपहरणाच्या गुन्ह्यात तब्बल 20 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केले. मैनुद्दित साहब पटेल (रा.भिमनगर झोपडपट्टी कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

अपहरणाच्या गुन्ह्यातील 20 वर्षांपासूनचा फरार आरोपी पेट्रोलपंपाजवळ येणार असल्याची माहिती कर्मचारी गोसावी यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून मैनुद्दितला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे, गुरव, भंडलकर, गिरमकर, गोसावी यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या