अकरावीची पहिली गुणवत्ता यादी आज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे. गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 30 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 31 ऑगस्टला रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार आहे.

गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे प्रवेशाची माहिती दिली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटवर जाऊन प्रवेशाची स्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यावर शिक्षण संचालनालयाद्वारे दुसऱया गुणवत्ता यादीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. दुसऱया यादीसाठी विद्यार्थी नव्याने अर्ज करू शकतात. पहिल्या यादीसाठी अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱया यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम बदलता येणार आहेत.

गुणवत्ता यादीत नाव आल्यावर

  • पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट झाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास विद्यार्थी सर्वसाधारण प्रवेशफेरीतून बाद होणार. अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या तीन फेऱयांनंतर विशेष फेरीत पुन्हा प्रवेशाची संधी दिली जाईल.
  • ज्या विद्यार्थ्यांना मिळालेला प्रवेश रद्द करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी संबंधित ज्युनियर कॉलेजशी संपर्क साधावा. अशा विद्यार्थ्यांनाही प्रवेशाच्या तीन फेऱयांनंतर विशेष फेरीत प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.