गडचिरोलीत पून्हा एसआरपीएफमधील 13 जवानांचे व सिंरोचा येथील एकाचे कोरोना निदान

272

आज जिल्हयात एकूण 43 नवीन कोरोना बाधित सापडले त्यातील 42 रूग्णांची नोंद त्यांच्या त्यांच्या जिल्हयात करण्यात आली. एसआरपीएफच्या सकाळी 29 रूग्णांनंतर अजून 13 जवानांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह मिळाले. आत्तापर्यंत जिल्हयात 600 हून अधिक सीआरपीएफ जवान गेल्या आठवड्यात दाखल झाले आहेत. सर्व संस्थात्मक विलगीकरणत ठेवण्यात आले आहेत. त्यातील आज एकाच दिवशी 42 जवान पॉझिटीव्ह मिळाले. सिरोंचा येथील व्यक्तीचा हैदराबाद येथे प्रवास केल्यानंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाला. सदर व्यक्ती आईच्या उपचारासाठी हैदराबाद येथे गेला. त्यानंतर जिल्ह्यात दाखल झाला त्यावेळी त्याला संस्थात्मक विलीनीकरण ठेवण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह मिळाला तर त्याच्या आईचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे.

दिलासादायक म्हणजे आज 18 एसआरपीएफ व स्थानिक सिरोंचा येथील एक रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना दवाखान्यातून सूट्टी देण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किनलाके, अधिसेविका अनिता निकोडे, सहा.अधिसेवक शंकर तोगरे यांनी कोरोनामुक्त व्यक्तींना विलगीकरण सूचना व साहित्य वाटप केले.

  • जिल्हयातील एकूण कोरोनामुक्त – 90
  • सद्या सक्रिय व उपचार सुरू असलेले कोरोना बाधित – 96
  • मृत्यू -1
  • एकूण बाधित – 187
आपली प्रतिक्रिया द्या