पुढच्या वर्षी बाप्पा 12 दिवस लवकर येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करताना गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’  अशी विनवणी केली. पुढच्या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन 12 दिवस अगोदर शनिवार 7 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. पुढच्यावर्षी गौरींबरोबर विसर्जन होणाऱ्या गणपतींचा मुक्काम सहा दिवसांचा व अनंत चतुर्दशीला विसर्जन होणाऱ्या बाप्पांचा मुक्काम 11 दिवसांचा असणार आहे.  अनंत चतुर्दशी  17 सप्टेंबर 2024 रोजी आहे.