राष्ट्र सेवा दलाच्या अध्यक्षपदी गणेश देवी

सामना ऑनलाईन । पुणे

राष्ट्र सेवा दलाच्या अध्यक्षपदी भाषातज्ञ, विचारवंत डॉ. गणेश देवी यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळ आणि सेवादल मंडळाच्या राष्ट्रीय बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

मावळते अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी डॉ. देवी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली. यावेळी मार्गदर्शन करताना देवी म्हणाले, राष्ट्र सेवा दलाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांजवळ लोकशाही, समाजवाद आणि साने गुरुजींच्या विचारांची शिदोरी आहे. सेवा दल कार्यकर्त्यांजवळ प्रगल्भता, कृतीशीलता, समानता ही त्रिगुणसूत्री आहे. या वारशाच्या जोरावर समविचारी व्यक्ती, संस्था आणि प्रक्रिया यांची भक्कम एकजूट उभारून आपण फॅसिस्ट शक्तींशी लढूया.

आपली प्रतिक्रिया द्या