
गिरगावात क्रांतीनगर ही 100 वर्षे जुनी चाळ आहे. या चाळीत राहणाऱ्या सर्वेश पवार या कमर्शिअल आर्टिस्टने चाळीचा देखावा आपल्या घरगुती गणपतीसाठी केला आहे. गिरगावाचे रूपांतर आता टॉवरगावमध्ये होत चालले असून जुनी चाळ संस्कृती टिकली पाहिजे म्हणून हा देखावा उभारण्यात आला आहे.

























































