गणपती मूर्तिकारांना जागा मिळेना! हायकोर्टाच्या आदेशामुळे कार्यशाळा अडचणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शहरातील गणपती मूर्तिकारांचा व्यवसाय हायकोर्टाच्या आदेशामुळे अडचणीत सापडला आहे. उत्सव काही महिन्यांवर आला आहे, मात्र अनेक कार्यशाळांना जागाच मिळत नसल्याने मूर्ती बनवायच्या कुठे, असा प्रश्न मूर्तिकारांपुढे उभा ठाकला आहे. विविध परवानग्यांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने त्यांची दमछाक होत आहे.

उच्च न्यायालयाने रस्ते तसेच वर्दळीच्या परिसरात मंडप उभारण्यास मनाई केली आहे. या आदेशामुळे पालिकेला गणपतीमूर्तींच्या कार्यशाळांवर कारवाईचा बडगा उगारावा लागला आहे. व्यवसाय करायचा कुठे, असा यक्षप्रश्न मूर्तिकारांना पडला आहे. लालबाग-परळ परिसरात मूर्तिकारांचे मोठमोठे कारखाने आहेत. त्यांना मोठय़ा भाड्याचा भुर्दंड सहन कराका लागत आहे, तर उपनगरातील छोटय़ा मूर्तिकारांचा परकानगीच्या निमित्ताने जाच सुरू आहे, असे जोगेश्वरीतील मूर्तिकार प्रसाद हळदणकर यांनी सांगितले.

आम्हाला अंतर्गत रस्त्याशेजारी मंडप उभारण्यास मनाई केली जात आहे, मात्र अशा रस्त्यांकर कित्येक गाड्या महिनोन्महिने तशाच उभ्या असतात. त्या गाडय़ांमुळे काहतुकीला कोणताही अडथळा होत नसेल तर आमच्या व्य्वसायाचा अडथळा कसा होईल? – गंगाधर आंबेरकर, प्रसिद्ध मूर्तिकार