गर्दी टाळूया, नियम पाळूया… बाप्पाला निरोप देऊया!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह महाराष्ट्रात दरवर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. श्री गणेशचतुर्थीपासून घराघरांत विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला अनंत चतुर्दशीदिनी निरोप देण्यात येणार आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही गणेश भक्तांची गर्दी टाळण्यासाठी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना नियमावली कायम ठेवत सार्वजनिक गणेशमंडळांच्या मूर्ती विसर्जनाला चौपाटय़ांवर परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लसीचे दोन डोस घेतले तसेच लसीचा दुसरा डोस घेऊन 15 दिवस झालेल्या कार्यकर्त्यांना  विसर्जनात सहभागी होता येणार आहे. विसर्जनास उपस्थित असतील त्यांना मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करावे लागणार आहे. मूर्ती चौपाटय़ांवर तैनात असलेल्या पालिका कर्मचाऱयांकडेच सोपवणे बंधनकारक असून कार्यकर्त्यांना पाण्यात जाता येणार नाही. मुंबईत सुमारे 12 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.

घरगुती गणपती विसर्जनासाठी नियम

विसर्जनासाठी मिरवणुकीने जाऊ नये, फक्त 5 व्यक्तींना परवानगी z मूर्ती शाडू पिंवा पर्यावरणपूरक असल्यास घरीच विसर्जन करा z घरच्या घरी विसर्जन शक्य नसल्यास पृत्रिम विसर्जनस्थळी जावे z चाळ, इमारतीतील सर्व गणेशमूर्ती एकाचवेळी विसर्जनास नेऊ नये z लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाऊ नये.

सार्वजनिक मंडळांसाठी

  • गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्यावेळी लसीचे दोन डोस घेतलेल्या फक्त 10 व्यक्तींना परवानगी असेल.
  • गणेशमूर्ती असलेले वाहन धीम्या गतीने नेऊ नये.
  • गणेशमूर्ती असणारे वाहन थांबवून भाविकांना दर्शन देऊ नये.
  • विसर्जनादरम्यान मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर पाळावे.

पोलीस सज्ज

मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. शहरातील विसर्जन ठिकाणांवर तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पेट्रोलिंग, सीसीटीव्हीतून सर्वत्र करडी नजर ठेवण्यात येणार आहे. 100 अधिकारी, 1500 सशस्त्र्ा दल व विविध शाखेतील कर्मचारी, एसआरपीएफच्या तीन पंपन्या, सीआरपीएफची एक पंपनी, 500 होमगार्ड,  विविध पथकातील 275 का@न्स्टेबल्स यांचा बंदोबस्त शहरात ठेवण्यात आला आहे.

स्वागत घेण्या लवकर या हो!

कशा पताका धागा सोडून आल्या खाली!

त्यांना कळले… आनंदाचा गेला वाली!

फुटे हुंदका पाट रिकामा… पाहून मखरा!

उदबत्त्यांना सहन होईना… गंधित नखरा!

जाण्यासाठी यावे हा का नियम तुला रे?

निर्माल्यास्तव उमलून यावे नियम फुला रे!

रांगोळीचे विस्कटणे हा… भाव मनाचा!

परतीच्या गाडीत काsंबणे… भार तनाचा!

मूर्ती नव्हती कधी मानली… पुटुंबीय तू!

अश्रद्धेच्या श्रद्धा होता… वंदनीय तू!

श्रीफळ आता एकाकी बघ… पाटावरती!

विसर्जनाने येई अवकळा… काठावरती!

विरहाची ही नाही कविता… अस्फुट टाहो!

निरोप पुठला? स्वागत घेण्या लवकर या हो!

पुन्हा रोजचे जगणे आणि… खोटे हसणे!

मिटून डोळे बघतो पुन्हा… मखरी बसणे!

साथ सोडुनी दुर्वा आल्या… पाण्यावरती!

शोक तरंगे अता सुखाच्या… गाण्यावरती!

प्रमोद जोशी देवगड