
देशभरात लाडक्या गणपती बाप्पाला उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला. परंतु उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये गणपती विसर्जनादरम्यान एका तरुणाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी बॉबी नावाच्या तरुणाला भोसकलं आणि पळ काढला. डीजेचा दणदणाट सुरू असल्यामुळे त्याच्या किंकाळ्या लोकांपर्यंत पोहचल्याच नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना मेरठमधील सरधना पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. शनिवारी (06 सप्टेंबर 2025) गणपती विसर्जनाची मिरवणुकीत बॉबी सुद्धा सहभागी झाला होता. डीजेच्या तालावर नाचण्याचा आनंद तो घेत होता. याच दरम्यान दुचाकीवरून तरुण येतात आणि त्यांचा बॉबी सोबत वाद होतो. वादाच रुपांतर हाणामारीत होतं आणि याचवेळी संधी साधत आरोपी बॉबीवर धारधार शस्त्राने हल्ला करतात. डीजेच्या आवाजामुळे बॉबीच्या किंकाळ्या कोणालाही एकायला आल्या नाही. रक्तबंबाळ झालेला बॉबीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येत. परंतु डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. खून गणपती विसर्जन मिरवणुक थांबवून झाला की मिरवणुकीतून घरी येताना झाला. याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अभिषेक आणि शेखर यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. NDTV ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.