जुन्या भांडणाच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, टोळक्याविरूद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने मित्रांसोबत क्रिकेट खेळत असलेल्या तरूणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.

ही घटना शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कात्रजमधील मांगडेवाडी मैदानात घडली. याप्रकरणी अविष्कार भिलारे (वय 19, रा. भिलारेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविष्कार आणि त्याचे मित्र काल मांगडेवाडीतील मैदानावर क्रिकेट खेळत होते. त्यावेळी तेथे आलेल्या दोघांनी साथीदारांच्या मदतीने जुन्या भांडणाच्या रागातून अविष्कारला शिवीगाळ केली.

त्यानंतर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी 8 ते 10 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले तपास करीत आहेत.