Video- खुषखबर! लॉकडाऊनमध्ये गंगेच्या प्रदुषणात घट

736

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशभरात लॉकडाऊन जारी केल्यापासून देशभरातील कारखाने, अनेक केमिकल कंपन्या बंद आहेत. तसेच लोकांनाही घराबाहेर पडण्यास बंदी आहे. देशात कोरोनाने थैमान घातले आहे, देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आहे, अशातच लॉकडाऊनमुळे एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे गंगा नदिच्या प्रदुषणात घट झाली आहे. गंगा नदिच्या प्रदुषणात तब्बल 40ते 50टक्के घट झाली आहे.

गंगेचे सर्वाधिक प्रदुषण हे कंपन्यातून येणाऱ्या सांडपाण्यामुळे होते. मात्र बरेचसे कारखाने व कंपन्या बंद असल्यामुळे गंगेत सोडले जाणारे सांडपाणी कमी झाले आहे. त्यामुळे गंगेच्या प्रदुषणात 40-50 टक्के कमी झाली आहे. त्यात 15-16 मार्चला झालेल्या पावसामुळे गंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. आता जे गंगेचं पाणी दिसतंय व पूर्वी जे दिसायचं त्यात खूप फरक जाणवतोय. आता पाणी स्वच्छ दिसतंय’, असे केमिकल इंजिनिअर आणि टेक्नॉलॉजी आयआयटीचे प्राध्यापक पीके मिश्रा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या