पुढील वर्षी खरोखरच गणपती बाप्पा लवकर येणार!

1269

आज अनंत चतुर्दशी म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप द्यायचा दिवस. दहा दिवस वाजत गाजत आणून आणि प्रेमभराने पुजून त्याला आजच्या दिवशी भरलेल्या मनाने आपण पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करतो. गंमत म्हणजे पुढील वर्षी बाप्पाने ही विनवणी ऐकली असून 2020मध्ये तो आपल्या भेटीला लवकरच येणार आहे.

यंदा 2 सप्टेंबर रोजी आलेला गणपती बाप्पा पुढील वर्षी 22 ऑगस्ट रोजी येणार आहे. मात्र त्यानंतर अधिक मास येत असल्याने 17 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे तर 25 ऑक्टोबर रोजी दसरा असणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी अर्थात दिवाळी असणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी बाप्पांचं आगमन लवकर होणार असलं तरी अधिक मासामुळे घटस्थापनेला आठवड्याभराचा उशीर होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या