गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी भक्तीचा सागर उसळला

अंगारकी संकष्टी निमित्त आज श्री देव गणपतीपुळे मंदिरात भक्तीसागर उसळला होता. भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. अंगारकी संकष्टी निमित्ताने आज पहाटे साडेतीन वाजल्यापासून श्री देव गणपतीपुळे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाने दर्शनासाठी चोख व्यवस्था ठेवली होती. संध्याकाळी मंदिर परिसरात वाजत-गाजत मिरवणूक निघाली.भाविकांसाठी मोफत खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले.