
मार्चच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना महागाईचा पहिला झटका बसला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली असून होळीच्या आठवडाभर आधी ही वाढ झाल्यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला याचा चटका बसणार आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचे म्हणजेच 14.2 चे दर 50 रुपयांनी वाढले आहेत. तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 350.50 रुपये इतकी प्रचंड वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर 1 मार्चपासून लागू होणार आहेत.
हे आहेत शहरांनुसार नवीन दर –
दिल्ली – जुना दर 1053 रुपये, नवीन दर 1103 रु.
मुंबई – जुना दर 1052.50 रुपये, नवीन दर 1102.5 रु.
कोलकाता – जुना दर 1079 रुपये, नवीन दर 1129 रु.
चेन्नई – जुना दर 1068.50 रुपये, नवीन दर 1118.5 रु.
व्यावसायिक सिलिंडरचे वाढीव दर शहरांनुसार –
दिल्ली – जुना दर 1769 रुपये, नवीन दर 2119.5
मुंबई – जुना दर 1721 रुपये, नवीन दर 2071.5 रु.
कोलकाता – जुना दर 1870, नवीन दर 2221.5 रु.
चेन्नई – जुना दर 1917 रुपये, नवीन दर 2268 रु.



























































