चेंबूरकरांनो सावधान! भाऊराव मंडईत जाऊ नका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेची चेंबूर येथील भाऊराव हरिश्चंद्र चेंबूरकर मंडईची इमारत ‘सी-1’ कॅटेगरीत मोडत असल्याने अतिधोकादायक झाली आहे. त्यामुळे रहिवाशांनी या मंडईत खरेदीसाठी जाऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

‘सी-1’ कॅटेगरीतील मंडईची ही अतिधोकादायक इमारत तातडीने पाडणे आवश्यक आहे. त्यामुळे परवानाधारक दुकानदारांना 5 ऑगस्ट रोजी 2016 रोजी नोटीस देऊन ही इमारत रिक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शिवाय मंडईमध्ये नोटीस लावून सर्व परवानाधारक आणि खरेदीसाठी येणाऱया ग्राहकांनाही येण्यास मज्जाव करण्यात आला होता. तरीदेखील अजूनही या ठिकाणचे काही दुकानदार अद्यापही या ठिकाणाहून पर्यायी जागेच्या ठिकाणी गेलेले नाहीत. यातच ही अतिधोकादायक इमारत 24 सप्टेंबर रोजी पाडण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांनी या ठिकाणाहून तातडीने स्थलांतरित व्हावे आणि पालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.