
आखाती युद्धाचा परिणाम दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरातील पाचपैकी उरल्यासुरल्या पंपांवरील एलपीजी गॅसचा साठा संपल्याने, त्यावर अवलंबून साडेचार हजारांहून अधिक रिक्षाचालक आणि – त्यांच्या कुटुंबीयांवर अक्षरशः उपासमारीची – वेळ आली आहे.
शहरात तब्बल साडेचार हजारांहून अधिक रिक्षाचालकांची संख्या असून, पाच ठिकाणी एलपीजी गॅसपुरवठा पेट्रोल पंप आहेत. यापूर्वी ४३ रुपये प्रति किलो दर असताना, गेल्या तीन-चार आठवड्यापासून यामध्ये दुप्पट वाढ – झाली. यापूर्वीच तीन पंप बंद झाले, तर कळंबा आणि लिशा हॉटेल चौकातील – पेट्रोल पंप सुरू होते. जिल्ह्यातूनही रिक्षाचालक येत असल्याने, हा भार वाढला असतानाच आता आज शहरातील एलपीजी गॅसचे पंपही गॅससाठा नसल्याने सकाळपासून बंद झाले.
गॅसच नाही तर देऊ कोठून, असे GOGAS सांगत, पंपमालकांनी पंपच बंद करणे पसंत केले आहे. गॅस कंपनीकडूनच गॅसचा पुरवठा बंद झाला आहे. ज्यांनी साठा करून ठेवला आहे. ते चढ्या भावाने विक्री करत आहेत. त्या चढ्या दरात घेऊन, विक्री करणे परवडत नसल्याचे पंप चालकांचे म्हणणे आहे. त्यात एलपीजी गॅसपुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्यांवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे यापूर्वी झालेल्या बैठकीतून समोर आल्याने रिक्षाचालक हतबल झाले आहेत.
आता मंत्री, आमदार, खासदार कोठे गेले?
जिल्ह्यातील तिन्ही मंत्री, आमदार, खासदार असे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना मतदानासाठी रिक्षाचालक चालतात; पण आज अडचणीत आलेल्या रिक्षाचालकांबद्दल – त्यांना कसलीही चिंता दिसत नाही. रिक्षाचालकांना सरकारनेच एलपीजी गॅस सक्तीचा – केला आहे, त्यासाठी भरमसाट फी आकारली गेली आहे; पण आता रिक्षाचालकांसह – त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असताना, सरकारचे दुर्लक्ष अक्षम्य – असल्याचे, महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी सांगितले.



























































