विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूकपूर्व जय्यत तयारी व पदाधिकाऱयांना मार्गदर्शन करण्याकरिता शिवसेना विभाग क्रमांक 11 व 12 यांच्या वतीने भायखळा येथे उद्या संध्याकाळी 7 वाजता पदाधिकारी मेळावा आणि मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित मेळाव्याला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख- आमदार आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
मेळाव्याला दोन्ही विभागातील प्रामुख्याने पुरुष उपशाखाप्रमुख, युवासेनेचे शाखाधिकारी ते विभाग अधिकारी, शाखाप्रमुख, शाखा संघटिका, शाखा समन्वयक (पुरुष-महिला) उपविभागप्रमुख व उपविभाग संघटिका, विधानसभा संघटक व समन्वयक (पुरुष-महिला) यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी शिवसेना नेते आणि पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष-शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर हेही मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याचे आयोजन विभागप्रमुख आशीष चेंबूरकर आणि विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी केले आहे.
अरविंद सावंत यांनी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघातून हॅटट्रिक साधली आहे. त्यानिमित्त त्यांचा शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 11 च्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.