
सामना ऑनलाईन, मुंबई
कोरेगाव भीमा हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नजरकैदेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार गौतम नवलखा यांची नजरकैदेतून मुक्तता झाली. तसे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने आज दिले होते. तसेच नवलखा यांना 24 तासांपेक्षा जास्त वेळ ताब्यात घेणे योग्य नसल्याचेही हायकोर्टाने स्पष्ट केले.
पुणे पोलिसांनी नवलखा यांना दिल्लीतून 28 ऑगस्ट रोजी अटक केली होती. तर चार मानवाधिकार कार्यकर्त्यांना देशाच्या वेगवेगळय़ा भागातून अटक केली होती. दरम्यान, दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयामुळे नवलखा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने नवलखा यांचे ट्रान्झिट रिमांडचे आदेशही रद्द केले आहेत.न्यायाधीश मुरलीधर आणि न्यायाधीश गोयल यांच्या खंडपीठाने मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला. महानगर दंडाधिकारी न्यायालयाचे आदेश कायदेशीरदृष्टय़ा अयोग्य असल्याचे मतप्रदर्शन हायकोर्टाने व्यक्त केले.


























































