
ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱया गौतमी पाटीलचे नवे गाणे यूटय़ूबवर आले आहे. ‘इश्काचा मौका’ असे या गाण्याचे बोल असून ही सप्तसूर म्युझिकची निर्मिती आहे. विकी वाघ यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलेले हे गाणे वैशाली सामंत यांनी गायले आहे, तर या गाण्यात गौतमी पाटीलसह कुणाल पाटील, कुणाल मासले, मनोज कुंभार, आदम शेख यांनी भूमिका केली आहे. धमाल शब्द, ठेका धरायला लावणारी उडती चाल ही ‘इश्काचा मौका’ची खासियत आहे.






























































