मृत महिलेच्या गर्भातून बाळाला जिवंत काढले

गाझामधील राफा शहरात रविवारी इस्रायली हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या पोटातून बाळाला जिवंत काढण्यात आले. ही महिला 30 आठवडय़ांची गर्भवती होती. डॉक्टरांनी तत्काळ सी-सेक्शन प्रसूतीद्वारे बाळाला सुखरूप काढले. जन्माच्या वेळी बाळाचे वजन 1.4 किलोग्राम होते. त्याची प्रकृती स्थिर असून सुधारत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. सबरीन अल-सकानी असे या महिलेचे नाव आहे. दोन घरांवर इस्रायली हवाई हल्ल्यात मुलीच्या आईशिवाय तिचे वडील आणि बहिणीसह 19 लोक मारले गेले आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 13 मुलांचा समावेश आहे.