गीता विद्यालयाच्या अतिक्रमणावर लवकरच तोडगा काढणार – महापौर

गोवंडीच्या शिवाजीनगरमधील गीता विद्यालयाने महानगरपालिकेच्या खेळाच्या मैदानावर अतिक्रमण केल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन अतिक्रमणाबाबत तोडगा काढण्यात येईल असे पेडणेकर यांनी पाहणीनंतर स्पष्ट केले.

गीता महाविद्यालयाने लगतच्या पालिकेच्या खेळाच्या मैदानावर अतिक्रमण करून तात्पुरत्या वर्गखोल्या बांधल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने गीता शाळेला नोटीस बजावून अतिक्रमण हटवण्यास सांगितले आहे. त्यामुळे संबंधित शाळेच्या व्यवस्थापकांनी महापौरांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याची विनंती केली होती. त्यामुळे महापौर पेडणेकर यांनी शाळेला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. या ठिकाणची शक्य असेल तितकी जागा पालिकेने ताब्यात घ्यावी आणि मोकळ्या जागेतील शेड काढून टाकावी अशा सूचना महापौरांनी पालिका प्रशासनाला दिली.

आपली प्रतिक्रिया द्या