रितेश-जेनेलिया तिसऱ्यांदा होणार आई-बाबा?

बॉलिवूडमधील मोस्ट अडॉरेबल कपल म्हणून ओळख असलेले जेनेलिया आणि रितेश देशमुख तिसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची चर्चा रंगल्या आहेत. नुकतेच एका कार्यक्रमामध्ये हे जोडपे एकत्र दिसले. या कार्यक्रमादरम्यान काढलेले या दोघांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच या व्हिडीओंवर दोघांचे चाहते कंमेट्सचा पाऊस पाडत आहेत.

या कार्यक्रमाकरीता जेनेलियाने जांभळ्या रंगाचा मिनी ड्रेस घातला होता. त्याबरोबरच हूप इअररिंग्स, गोल्ड स्टेटमेंट हिल्स व न्यूड मेकअप केला होता. तर रितेशने पांढऱ्या रंगाचे शर्ट व निळ्या रंगाची पँट असा पोशाख परिधान केला होता. सोशल मीडियावर या दोघांचे व्हिडीओ पाहिल्यानंतर फक्त एकाच गोष्टीकडे नेटीझन्सचे लक्ष वेधले होते. जेनेलियाने घातलेल्या ड्रेसमध्ये तिचे पोट एखाद्या गर्भवती महिलेसारखे दिसत असल्याने लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला.

अनेक सोशल मीडिया युजर्सनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी, पुन्हा प्रेग्नेंट? असे विचारले आहे तर काहींनी ती गर्भवती असल्याचे म्हटले आहे. मात्र याबाबत जेनेलिया किंवा रितेशने कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याने चाहते गोंधळात पडले आहेत.