रितेश-जेनेलिया करणार अवयवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता  रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया यांनी अवयवदान करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डॉक्टर दिनाचे औचित्य साधून उभयतांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली.

जेनेलियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलंय, रितेश आणि मी फार आधीपासून अवयवदानाचा विचार करत होतो. मात्र डॉक्टर दिनाचं औचित्य साधत आम्ही आमचे अवयव दान करण्याचा निर्णय घेत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल आम्ही डॉ. नोझर शेरिअर आणि ‘एफओजीएसआय’ चे आभार मानतो. एखाद्याला सर्वोत्तम भेट द्यायची असेल तर जीवनदान हीच भेट सर्वोत्तम असू शकते. तुम्हीदेखील पुढाकार घ्या आणि आयुष्य वाचवण्यासाछी प्रतिज्ञा करा, तुमचे अवयवदान करण्याची शपथ घ्या, असं आवाहनही दोघांनी केलं आहे.