
सामना ऑनलाईन। बल्गेरिया
खेळ म्हटलं की हार जीत ही आलीच. त्यातही हार ही पचवावी लागते. पण ते सगळ्यांनाच जमतं असं नाही. असचं काहीसं बल्गेरियात एका बॉक्सिंग मॅचदरम्यान झालं आहे. बॉक्सिंग मॅचमध्ये हरल्यामुळे जॉर्जियाचा बॉक्सर लेवन शोनिया याने कोचलाच ठोसे लगावत धुतले.
लेवन आणि बल्गेरियाचा बॉक्सर स्पास जेनोव यांच्यात ही मॅच होती. यात स्पासने लेवनला अक्षरश:लोळवले. स्पासकडून लेवनला पराभव पत्करावा लागण्याची ही 12 वी वेळ होती. यामुळे हा पराभव लेवनच्या जिव्हारी लागला. रेफरीने निर्णय जाहीर करण्याआधीच तो रिंगमध्येच चिडचिड करू लागला होता. त्याने मॅच संपण्याआधी पुन्हा एकदा स्पासला लढण्याचे आव्हान दिले. यामुळे रेफरीने त्याला दोनवेळा समज दिली. त्यानंतर कोचनेही लेवनला शांत राहण्याचा सल्ला दिला. पण लेवनला कोचचा सल्ला रुचला नाही व त्याने थेट कोचच्या तोंडावरच ठोसे लगावण्यास सुरूवात केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी लेवनवर टीका केली आहे.
Astonishing stuff from Bulgaria tonight as a boxer goes rogue after refusing to accept defeat and exchanges shots with his own coach. pic.twitter.com/mVsVOPB42p
— Michael Benson (@MichaelBensonn) October 27, 2018





























































