घरबसल्या मिळवा पीव्हीसी आधार कार्ड

तुमचे आधार कार्ड हरवले किंवा खराब झाले तर तुम्ही नवीन आधार कार्ड मिळवू शकता. घरी बसल्या पीव्हीसी आधार कार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकता. हे कार्ड आधारच्या अधिकृत वेबसाइटवरून फक्त 50 रुपये शुल्क भरून मागवता येते. यासाठी आधारच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा भरावा लागेल. सेंट ओटीपीवर क्लिक केल्यावर ओटीपी येईल. तो टाईप केल्यावर सबमिट करा. यानंतर, ‘माय आधार’ विभागात  ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ वर क्लिक करावे लागेल. पेमेंट पेजवर जावून 50 रुपये शुल्क भरावे.