बांगला देशात जाऊन केलेले लग्न पडले महाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका हिंदुस्थानी युवकाला बांगलादेशमध्ये जाऊन लग्न करणे चांगलेच महाग पडले आहे. सीमा सुरक्षा दलाने या नवविवाहित जोडप्याला अटक केली आहे. जयकान्तो चंद्रा राय हा पश्चिम बंगालमधील बल्लावपूर गावातील तरुण आहे. तर चंपा (बदलेले नाव) ही 18 वर्षीय तरुणी बांगलादेशमधील नेराळी गावात राहणारी आहे. या दोघांचे फेसबुकवरून सुत जुळले. त्यानंतर जयकान्तो 8 मार्चला सीमा पार करून बांगलादेशात गेला. 10 मार्चला दोघांचे लग्न झाले. 25 जूनपर्यंत दोघेही बांगलादेशमध्ये राहिले. त्यानंतर त्या दोघांनी हिंदुस्थानात येण्यासाठी बांगलादेशमधील एका दलालाची भेट घेतली आणि त्याला 10 हजार बांगलादेशी टाका दिले. त्याच्या मदतीने ते हिंदुस्थानी सीमेत घुसले.